Sunday, 24 May 2020

महापालिका शाळांमध्येही ऑनलाइन शिक्षणाची शक्‍यता

पिंपरी  (प्रतिनिधी) – ‘करोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील खासगी शाळांबरोबरच आता महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात देखील ऑनलाइन शिक्षणाचेच होण्याची शक्‍यता आहे. त्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. व्हॉट्‌सऍप, यू ट्यूब, शिक्षकांचे ब्लॉग्ज आदी सोशल मीडियासह रेडिओ कम्युनिटी, स्थानिक केबल चॅनेल आदी विविध पर्यायांचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापर करण्याबाबत चाचपणी सुरू झाली आहे. 

No comments:

Post a Comment