Sunday 24 May 2020

तगादा लावणाऱ्या शाळांवर होणार कारवाई

पिंपरी (प्रतिनिधी) – करोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर चालू शैक्षणिक वर्षात शाळांनी पालकांकडून टप्प्याटप्प्याने किंवा त्यांच्या सोयीने शुल्क घ्यावे. तसेच, कोणतीही शुल्क वाढ करू नये. पालकांना किंवा विद्यार्थ्यांना शालेय शुल्कासाठी तगादा लावला जात असेल अथवा त्रास दिला जात असेल तर संबंधित शाळांविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असे सहाय्यक प्रशासन अधिकारी पराग मुंडे यांनी शनिवारी (दि. 23) स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment