Sunday, 24 May 2020

यंदाची रमजान ईद “मदती’ची

पिंपरी  (प्रतिनिधी) – मुस्लीम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यंदाची ईद ही खऱ्या अर्थाने गरजूंना मदत करणारी ईद ठरत आहे. लॉकडाऊन शिथिल होऊन दुकाने उघडण्यास परवानगी मिळालेली असताना देखील दरवर्षीच्या तुलनेत यंदा मुस्लीम बांधवांचा नवे कपडे व इतर वस्तू खरेदी करण्यात खूप कमी आहे. यंदाची ईद हे नवीन कपडे न खरेदी करता गरजूंना मदत करुन साजरी करण्याचा कित्येक मुस्लिम कुटुंबानी निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. 

No comments:

Post a Comment