http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31258&To=5
भरतनाट्यम मधून उलगडलेल्या<br>कृष्णलीला अनुभवताना रसिक मंत्रमुग्ध !
पिंपरी, 1 जुलै
यशोदेच्या हातून लोणी खाणारा बाळकृष्ण ... व्याकुळतेने कृष्णाची वाट पाहाणा-या गोपिका... कृष्णाच्या विरहाने हळवी झालेली राधा....गोपिकांच्या मोहपाशात अडकलेला श्रीकृष्ण..... अर्जुनाला गीतेमधून जीवनाचे सार सांगणारा तत्वज्ञ कृष्ण... अशा श्रीकृष्णाच्या विविध भावछटा विलोभनीय नृत्याविष्कारातून पाहाताना रसिकांना अक्षरशः श्रीकृष्ण युगाचा साक्षात्कार झाला. निमित्त होते कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि निगडी येथील नृत्यकलामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आलेल्या कृष्णमयी' या भरतनाट्यम नृत्यरचनेवर आधारित तोषदा गदगकर आणि गंधाली शिंदे या दोन विद्यार्थिनींच्या अरंगेत्रमचे. या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
No comments:
Post a Comment