इंदुरीत माती-मुरूम चोरांच्या प्रतापाने मृतदेह जमिनीबाहेर: पिंपरी । दि. १ (प्रतिनिधी)
माती, मुरूमचोरांमुळे इंदुरीतील ठाकर समाजाच्या स्मशानभूमीतील पुरलेले मृतदेह बाहेर येऊ लागले आहेत. चोरट्यांच्या या प्रतापामुळे ठाकर समाज उद्विग्न झाला असून, त्यांनी आज मातीचोरांचा निषेध केला. ग्रामपंचायतीने स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment