बोगस मालाचे बिल दाखवून जकातचोरी
मोशीमध्ये अकरा लाखांचा गुटखा पकडला
पिंपरी, 2 जुलै
वाहनामध्ये गुटख्याचा माल असताना मसाल्याचे बील दाखवून त्यावरही जकात न भरता केवळ परगमन पास घेऊन जकात चोरी करण्याच्या अनोख्या कलृप्तीने जकात विभाग चक्रावला आहे. जकात विभागाने सुमारे अकरा लाख रुपये किमतीच्या जकात मालावर सहा लाख 80 हजार रुपयांच्या दंडाची नोटीस मालाचे आयातक आणि ट्रान्सपोर्ट कंपनीला बजाविली आहे.
No comments:
Post a Comment