Wednesday, 18 July 2012

तरुणींना सामोरे जावे लागतेय तरुणांच्या टवाळखोरीला !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31611&To=6
तरुणींना सामोरे जावे लागतेय
तरुणांच्या टवाळखोरीला !
पिंपरी, 13 जुलै
आसाममध्ये गुवाहाटी शहरात एका तरुणीला दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने अमानुष मारहाण केल्याचा प्रकार घडल्यानंतर देशभरातून त्याचे तीव्र पडसाद उमटले. सगळ्यांनीच या प्रकाराचा निषेध केला. हे प्रकार विशिष्ठ राज्यापुरते मर्यादित नसून देशातील प्रत्येक शहरातून असे प्रकार कमी अधिक प्रमाणात घडताना दिसतात. प्रत्येकवेळी मुलींना मारहाण होतेच असे नाही परंतु त्यांची छेड काढणे, काहीतरी अचकट-विचकट बोलणे अशा प्रकारातून मुलींना जीव नकोसा केला जातो. विशेषतः बसमधून प्रवास करणा-या मुलींना या प्रकाराला अधिक सामोरे जावे लागत आहे असे पाहणीनंतर आढळून आले आहे.

No comments:

Post a Comment