सभापतिपदी लोखंडे बिनविरोध: पिंपरी । दि. १३ (प्रतिनिधी)
महापालिका शिक्षण मंडळाच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय लोखंडे, तर उपसभापतिपदी राष्ट्रवादीशी संलग्न रिपब्लिकन गवई गटाच्या लता ओव्हाळ यांची बिनविरोध निवड झाली. स्थायी समिती सभागृहात ही निवडणूक घेण्यात आली.
महापौर मोहिनी लांडे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण मंडळ सभापतिपदाची निवडणूक झाली. सभापती आणि उपसभापतिपदासाठी इच्छुक असणार्या अन्य सदस्यांची समजूत काढण्यात आली. सभापतिपदासाठी लोखंडे यांचा तर उपसभापतिपदासाठी ओव्हाळ यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. निश्चित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणूक प्रक्रिया ४ वाजता सुरू झाली. सभापतिपदासाठी एकमेव अर्ज असल्याने लोखंडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे महापौर लांडे यांनी घोषित केले. या निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली उपसभापतिपदाची निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी ओव्हाळ यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. उपस्थितांनी निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
सभागृहाबाहेर पडल्यानंतर सभापती लोखंडे, उपसभापती ओव्हाळ यांनी अण्णासाहेब मगर यांच्या तसेच महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
No comments:
Post a Comment