बालकाचा करुण अंत: - महापालिकेच्या बेपर्वाईने चिंचवड येथे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात
पिंपरी । दि. १५ (प्रतिनिधी)
एम्पायर इस्टेट ते काळेवाडी पुलाच्या कॉलमकरीता खोदलेल्या १५ ते २0 फूट खड्डय़ातील पाण्यात बुडून प्रदीप नाथा साळवे (वय १२, रा. बौद्धनगर, लिंक रोड, पिंपरी) या बालकाचा करुण अंत झाला. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास लिंक रोडपासून जवळच असलेल्या पवना नदीपात्राजवळ ही घटना घडली. पुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्डय़ांच्या बाजूने पत्र्यांचे कुंपण लावणे आवश्यक होते. मात्र, त्याबाबत निष्काळजीपणा दाखविला गेल्यामुळे प्रदीपला जीव गमवावा लागल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment