गटारी अमावस्येमुळे शेळ्या-मेंढय़ांची विक्रमी आवक: चाकण। दि. १५ (वार्ताहर)
आखाड महिन्यातील गटारी अमावास्या जवळ येऊन ठेपल्याने चाकण बाजारात शेळ्या-मेंढय़ांना मागणी वाढली. कालच्या आठवडे बाजारात ७६00 शेळ्या-मेंढय़ांची विक्री झाली. शेळ्या-मेंढय़ांना ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मात्र पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने येथील जनावरांच्या बाजारात गाय, बैल, म्हशींची विक्री घटली. या बाजारात १ कोटी ७0 लाखांची उलाढाल झाली.
No comments:
Post a Comment