पावसाळ्यातही बस गळक्याच: पीएमपीकडून नाही मॉन्सूनपूर्व देखभालीची कामे
पुणे। दि. २९ (प्रतिनिधी)
सार्वजनिक वाहतूक सेवा पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांना देणार्या पीएमपीएमएलच्या ३५0 बसेसची मॉन्सूनपूर्व देखभाल झाली नसल्याचे उघडकीस आले आहे. मॉन्सूनपूर्व देखभालीअभावी ब्रेक फेल झाल्यास पुणेकरांच्या जीवाला धोका असल्याने आठवडाभरात दुरुस्ती आणि देखभाल करण्याची मागणी पीएमपीएमएल प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी आणि विवेक वेलणकर यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment