http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31051&To=10
पाण्याच्या पुनर्वापरास एमआयडीसीचा विरोध ?
निशा पाटील
पाणी खरेदीचा खर्च आणि सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण यावर तोडगा काढणारा पथदर्शी प्रस्ताव पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केला आहे. त्यानुसार महापालिका सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी उद्योगांना गार्डनिंग, कुलिंग, फ्लोरींग आदी कामासाठी हजार लीटर मागे दहा रुपये या दराने विकणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) याच पाण्यासाठी साडेअठरा रुपये आकारते. महापालिकेच्या प्रस्तावामुळे हजार लीटरमागे उद्योजकांचे साडेआठ रुपये वाचणार आहेत. त्यामुळे उद्योजकांकडून या प्रस्तावाचे स्वागत होत असले तरी पाण्याच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर मिळणाऱया उत्पन्नावर पाणी सोडण्यास एमआयडीसी तयार नाही. त्यामुळे महापालिकेलाही हा प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवण्याची वेळ आली आहे.
No comments:
Post a Comment