http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32629&To=6
'पाडापाडी' 15 दिवसात न थांबविल्यास पिंपरी-चिंचवड बंद !
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर सुरु असलेल्या कारवाईच्या विरोधात शिवसेना, भाजप, रिपाइं, मनसेसह विविध सामाजिक संघटनांनी आज (गुरुवारी) काढलेल्या महामोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. घरे वाचविण्याच्या मागणीसाठी सुमारे पाच हजार नागरीक रस्त्यावर उतरले. महापालिका प्रवेशव्दाराजवळ बेकायदा बांधकाम करणा-यांची यादी जाळून शासन आणि महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला. येत्या 15 दिवसात पाडापाडी कारवाई न थांबविल्यास शहर बंदची हाक देण्यात आली आहे. या मोर्चाच्या निमित्ताने शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीसोबत मनसे एकत्र आली. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते आझम पानसरे हेही मोर्चात सहभागी झाल्यामुळे तो चर्चेचा विषय झाला आहे.
No comments:
Post a Comment