पालिका गणेशोत्सव स्पर्धेचे उद्या पारितोषिक वितरण: पिंपरी : महापालिका आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २0१२ चा पारितोषिक वितरण समारंभ चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात बुधवारी, दि. २६ रोजी दुपारी ३ ला आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महापौर मोहिनी लांडे यांनी दिली.
विजेत्या गणेशोत्सव मंडळांना प्रशस्तिपत्रक व धनादेशाचे वाटप महापौरांच्या हस्ते होईल. कार्यक्रमास खासदार गजानन बाबर, शिवाजीराव आढळराव पाटील, सुप्रिया सुळे, आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, महाराष्ट्र राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष आझम पानसरे, आयुक्त श्रीकर परदेशी, उपमहापौर शरद मिसाळ, स्थायी समिती सभापती नवनाथ जगताप, पक्षनेत्या मंगला कदम, विरोधी पक्षनेते कैलास कदम, क्रीडा समिती सभापती रामदास बोकड, महिला व बालकल्याण समिती सभापती शुभांगी लोंढे, शहर सुधारणा समिती सभापती आशा सुपे, विधी समिती सभापती वैशाली जवळकर उपस्थित राहणार आहेत.