निगडी प्राधिकरणातील संभाजी चौकाजवळ रस्त्यावर ऑईल सांडल्याने अर्ध्या तासात एक मोटार आणि चार दुचाक्या घसरून किरकोळ अपघात झाले. आज (मंगळवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास झालेल्या घटनेत एका लहान मुलीसह काहीजण किरकोळ जखमी झाले.
प्राधिकरणातील संभाजी चौकाजवळ आज सकाळी टँकरमधून ऑईल गळती झाली. त्यानंतर येथून जाणारी एक मोटार घसरली. मात्र, चालकाच्या प्रसंगवधानामुळे हा अपघात टळला. परंतु, त्यानंतर चार दुचाक्या या ठिकाणी घसरल्या. त्यात दुचाकीवरील एक महिला व नऊ वर्षाची एक लहान मुलगी जखमी झाली. नागरिकांनी याबाबत अग्निशमन विभागाला कळविले. जवानांनी घटनास्थळी येऊन रस्ता धुतला. त्यानंतर येथील वाहतूक सुरळीत झाली.
No comments:
Post a Comment