Tuesday, 8 April 2014

महापालिकेचा 11 एप्रिलपासून प्रशासकीय 'फुले-आंबेडकर' जयंती महोत्सव

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने यंदा क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 11 ते 14 एप्रिल या कालावधीत 'प्रशासकीय' जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेतली असल्याची माहिती महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत दिली.

No comments:

Post a Comment