पदपथावरील अतिक्रमणे तसेच अनधिकृत फ्लेक्स काढून टाकण्याचे आदेश आयुक्त राजीव जाधव यांनी आज (शनिवारी) अधिका-यांना दिले. बालाजीनगर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सुशोभिकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
रस्ते पाहणी दौ-यांतर्गत आज सकाळी साडेआठ वाजल्यापासून अ, क, इ व फ येथील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या भागांची पाहणी आयुक्त राजीव जाधव यांनी केली. प्रथमत: भोसरी लांडेवाडी येथून टेल्कोरोडकडे जाणा-या रस्त्याच्या पाहणी दौ-याला प्रारंभ झाला व निगडी प्राधिकरण येथील शिंदेवस्ती रावेतकडे जाणा-या नियोजित रेल्वेपुलाबाबतची पाहणी करुन दौ-याचा शेवट करण्यात आला.
No comments:
Post a Comment