चौकशीची मागणी ः सन 2000 पासून पाठपुरावा
पिंपरी, (प्रतिनिधी) – सन 1982-83 ते 2014-15 या आर्थिक वर्षातील लेखापरीक्षण करताना 33 हजार 777 आक्षेप घेण्यात आले आहेत. विशेष लेखापरीक्षणातील आक्षेपाधीन 1 हजार 787 कोटी 54 लाख 4 हजार 65 एवढी रक्कम संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. लेखापरीक्षणातील आक्षेपांवर तुरंत कार्यवाही सुरू करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी सन 2000 पासून सातत्याने लावून धरली. मात्र, महापालिका प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. स्थानिक पातळीवर कारवाई होत नसल्यामुळे आक्षेपाधीन रक्कम वसूल करुन आठ दिवसांत दोषींवर कारवाई करावी, अशी तक्रार भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आयुक्तांसह लेखा परीक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
No comments:
Post a Comment