पिंपरी - भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या पिंपरी- चिंचवड शहरात होणाऱ्या त्रैमासिक दीर्घ बैठकीत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, तसेच अन्य काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला भुईसपाट केल्यानंतर या पक्षाने पुन्हा डोके वर काढू नये यासाठी महापालिकेत सत्तेवर आलेल्या भाजपचे पाय या बैठकीच्या माध्यमाद्वारे शहरात आणखी भक्कम करण्याचा प्रयत्न आहे. येत्या २६ व २७ एप्रिलला ही बैठक होणार असून, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह प्रदेश कार्यकारिणीचे एक हजाराहून अधिक सदस्य, मंत्रिगण, खासदार, आमदार उपस्थित राहणार असल्याचे समजते.
No comments:
Post a Comment