पिंपरी - मेट्रो रक्तपेढीप्रमाणे औंध येथील जिल्हा रुग्णालयासाठी बांधण्यात आलेले उपाहारगृह तब्बल पाच वर्षांपासून विनावापर पडून आहे.
औंध रुग्णालय आवारातील रुग्णालय इमारतीसमोरील चहा-नाश्त्याची टपरी नुकतीच जळून खाक झाली. सुदैवाने ही घटना मध्यरात्री घडल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र रुग्णालयाचे उपाहारगृह बांधून तयार असताना, ते चालविण्याबाबत प्रशासन उदासीन का? शासनाच्या लाखो रुपयांची उधळपट्टी कशासाठी, असा संतप्त सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.
No comments:
Post a Comment