Thursday, 13 April 2017

“बीआरटी’त खासगी वाहनांना पुन्हा “नो एन्ट्री’च?

तुकाराम मुंढे यांच्या सूचना : “पीएमपी’ प्रवाशी मंचची तक्रार
  • अमोल शित्रे 
पिंपरी – निगडी ते दापोडी “बीआरटी’ मार्गात खासगी वाहनांना प्रवेश बंदच राहण्याची चिन्हे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा “बीआरटी’ मार्ग खासगी वाहनांसाठी खुला करावा, अशी मागणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केली होती. मात्र, खासगी वाहनांना या मार्गावर “एन्ट्री’ दिल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होवू शकतो. त्यामुळे नागरिकांच्या जीवावर बेतेल असा निर्णय घेता येणार नाही. खासगी वाहनांसाठी खुला केलेला “बीआरटी’ मार्ग पुन्हा बंद करावा, अशा सूचना “पीएमपीएमएल’चे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment