पिंपरी - शहराची लोकसंख्या २२ लाखांवर आहे. शहरालगतच्या चाकण आणि तळेगावचाही विस्तार होत आहे. शहरात गुन्हे करून अनेक गुन्हेगार लगतच्या ग्रामीण भागात लपण्यासाठी पळून जातात. ग्रामीण भागातील गुन्हेगारीत वाढ आहे. गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची गरज आहे. याबाबत सरकारच्या वित्त विभागाने मान्यता दिली असून, विधानसभेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात घोषणा होण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment