Wednesday, 22 November 2017

राहुल कलाटे यांनी स्वतःची बौद्धिक दिवाळखोरी जाहीर केली; भाजप नगरसेवक हर्षल ढोरे यांचे प्रत्युत्तर

महापालिकांच्या विषय समित्यांमध्ये कोणते विषय मंजूर करायचे आणि नाकारायचे हे ठरविण्याचे त्या त्या सभेला अधिकार आहेत. एवढा साधा आणि सोपा कायदा माहित नसणारे शिवसेना गटनेते व शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी ऐनवेळचे विषय घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा देऊन स्वतःच्या अकलेचे तारे तोडले आहेत. त्याचप्रमाणे भाजपचे लोक शिवसेनेला घाबरतात, असे म्हणत स्वतःची बौद्धिक दिवाळखोरीही कलाटे यांनी जाहीर केली आहे, असे जोरदार प्रत्युत्तर भाजप नगरसेवक व स्थायी समिती सदस्य हर्षल ढोरे यांनी दिले आहे. महापालिकेतील अधिकारी व पदाधिकाऱ्यांना प्रस्ताव मंजुरीसाठी अश्लिल भाषेत शिवीगाळ करण्याची कलाटे यांची ही कोणती लोकशाही आहे, असा सवालही ढोरे यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment