पिंपरी – केंद्र व राज्य शासनाचे पिंपरी-चिंचवड शहराच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण प्रकल्प मार्गी लावणे, त्या प्रकल्पांच्या कामकाजास गती देवून ते पुर्ण करण्यासाठी समन्वयांची भूमिका बजाविणे, याकरिता मेसर्स पॅलाडीयम कन्सल्टींग इंडिया प्रा. लि. या संस्थेची नेमणूक करण्यात आली. त्यानुसार महापालिकेत सिटी ट्रान्स्फॉर्मेशन कार्यालयाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत पॅलाडीयम संस्थेवर स्वच्छ भारत अभियानच्या सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविली आहे.
No comments:
Post a Comment