काळेवाडी – पिंपरी-चिंचवड शहरातील पीमपीएमएलच्या अनेक बसथांब्यांचे जाहिरातीचे पत्रके चिकटवून विद्रुपीकरण करण्यात येत आहे. शहरातील कित्येक बसथांबे सध्या जाहिरातीच्या पत्रकांनी अक्षरशः माखले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पीएमपीएमएलचे शहरात मोठे जाळे आहे. कित्येक गावांनी बनलेल्या या शहरात प्रत्येक गावात किमान दोन ते तीन तरी बसस्टॉप आढळतात. प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी चांगले बसथांबे देण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु वेगवेगळ्या कारणांनी आणि विघ्नसंतोषी प्रवृत्तीच्या लोकांनी या बसथांब्यांची दूरवस्था केली. आधीच जर्जर होऊ लागलेल्या या बसथांब्यांचे जाहिरातबाजीने विद्रुपीकरण देखील सुरू केले आहे.
No comments:
Post a Comment