पिंपरी – सार्वजनिक जागेवर, रस्त्यावर अस्वच्छता पसरवणारे नागरीक, संस्था यांचेकडून महापालिका आरोग्य विभाग प्रशासकीय खर्च वसूल करते. ही स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवण्यासाठी काम करणाऱ्या आरोग्य निरीक्षकांना वसूल केलेल्या रकमेच्या 20 टक्के बक्षीस म्हणून देण्याची परंपरा पाळली जात आहे. त्यानुसार अ, ब आणि क-प्रभागातील आरोग्य निरीक्षकांना सुमारे पाच लाख रुपये बक्षीस वाटप करण्यात आले असून याकरिता आयुक्तांची कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे उघड झाले आहे.
No comments:
Post a Comment