मोशी – आपले दोन्ही काठ सुजलाम सुफलाम करत संथ वाहणाऱ्या इंद्रायणीने जना-जनाच्या मनातच नव्हे संतांच्या अभंगातही मानाचे स्थान मिळविले आहे. परंतु आज त्याच इंद्रायणीची दूरवस्था झाली आहे. इंद्रायणीच्या नशिबी पुन्हा एकदा काळे पाणी आले असून, या काळसर व रासायनिक तवंग असलेल्या पाण्यावर जलपर्णीचा वेढा वाढू लागला आहे. पावसाळा संपल्यानंतर अवघ्या दीड ते दोन महिन्यातच पुन्हा जलपर्णी अवतरली असून इंद्रायणीचे प्रदूषण दुर्गंधीने जाणवू लागले आहे.
No comments:
Post a Comment