काळेवाडी- काळेवाडी परिसरातील तापकीर मळा चौक ते पंचनाथ चौक दरम्यान रस्त्यावर अतिक्रमणाने बाजार भरवला आहे. या बाजारामुळे या परिसरातील नागरिकांना रोज प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
या वाहतूक कोंडीसाठी वाहनांच्या वाढत्या प्रमाणासोबत शहरातील रस्त्यावर झालेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे जबाबदार आहेत. दिवसागणिक शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यातच वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रस्ते वाहतुकीसाठी कमी पडत आहे. त्यातच काळेवाडी परिसरात लहान-मोठ्या व्यावसायिकांची अतिक्रमणे वाढत चालली आहेत.
No comments:
Post a Comment