पिंपरी (Pclive7.com):- आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता असून राजस्थानमध्ये भाजपला फटका बसू शकतो. तर, उत्तर पूर्वच्या तिन्ही राज्यात भाजपची सत्ता येईल असे भाकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. दलित मते भाजपकडे वळली असून २०१९ च्या निवडणुकीला माझा पक्ष आणि मी भाजप सोबत आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच शिवसेनेला सोबत ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे सेनेला कॅबिनेट मंत्रिपद देऊन उद्धव ठाकरे यांची नाराजी भाजपच्या नेत्यांनी दूर करावी. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आरपीआय राज्यात २ जागांवर निवडणूक लढणार असून विधानसभेसाठी एका जिल्ह्यात १ ते २ जागा देण्यासाठी प्रयत्न करणार असून किमान ४० जागा लढविणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment