पिंपरी (Pclive7.com):- काही वर्षापूर्वी स्वच्छ शहर म्हणून राज्यात प्रथम आणि देशात ९ वा क्रमांक पिंपरी चिंचवडने पटकवला होता. गेल्यावर्षी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत पिंपरी चिंचवड ९ व्या क्रमांकावरून थेट ७२ व्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यात आता सुधारणा होत यंदाच्या वर्षी शहराने ७२ वरून ४३ व्या क्रमांकावर मजल मारली आहे. वर्षभरात केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत राबविलेल्या उपक्रमांमुळे ही सुधारणा झाली आहे.

No comments:
Post a Comment