पिंपरी – सध्या पावसाळा सुरु झाला असून, या काळात ग्रामीण भागातील नागरिकांना वीजेसंदर्भात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातल्या त्यात रोहित्र बिघाडाने या समस्यांची तीव्रता अधिक वाढते. बिघडलेले रोहित्र बदलून देण्यासाठी ग्राहकांकडे पैशाची मागणी करणाऱ्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

No comments:
Post a Comment