जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी प्रभागातील रस्त्यावरील झाडांच्या लोखंडी जाळ्या काढण्याच्या कामास महापालिका उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाकडुन सुरूवात करण्यात आली आहे. गेली चार पाच वर्षापुर्वी रोप व झाडांच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या झाडे मोठी झाल्याने परिसरातील अनेक झाडे लोखंडी जाळ्यात अडकली होती. काही झाडात या लोखंडी जाळ्या झाडांनी सामावुन घेतल्याचे चित्र परिसरातुन दिसत होते.पर्यावरण प्रेमी नागरीकांकडुन याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. सकाळ मधुन याबाबत सचित्र बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. तर सकाळ मधुन या विषयाचा पाठपुरावा करण्यात आला होता.
No comments:
Post a Comment