पिंपरी – महापालिकेने चिंचवड प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेची इमारती नियोजित पोलीस आयुक्तलयासाठी भाड्याने दिली आहे. त्यामुळे ही शाळा दळवीनगर येथील इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहे. या शाळेच्या इमारतीत सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे पालकांनी जागेचा अट्टाहास न धरता दळवीनगर येथील शाळेत विद्यार्थ्यांना पाठविणे गरजेचे आहे. दरम्यान, पालकांच्या सूचनांचा विचार केला जाईल. आणखीन आवश्यक त्या सुविधा पालिकेतर्फे उपलब्ध करुन दिल्या जातील. परंतु, पालकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करु नये, असे आवाहन सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment