दिघी- पिंपरी-चिंचवड महानगर पालिका अंतर्गत दिघी बोपखेल प्रभागात 24 तास पाणी योजना कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला नगरसेवक लक्ष्मण उंडे, नगरसेविका हिराबाई गोवर्धन घुले, नगरसेवक निर्मलाताई गायकवाड, नगरसेवक विकास डोळस, माजी नगरसेवक दतात्रय गायकवाड, माजी नगरसेवक भाऊसाहेब सुपे, चेतन घुले, विठ्ठल घरे व परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी माजी नगरसेवक भाऊसाहेब सुपे यांनी सांगितले की, या योजनेचा नागरिकांना फायदा होणार आहे. पूर्वी या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. सकाळी एक ते दोन तास पाणी पुरवठा होत होता, त्यामुळे महिलांना त्रास होत होता. परंतु येणार्या काळात नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळणार आहे. हे काम सुरू असताना खोदकाम करताना नागरिकांना त्रास होईल परंतु पाण्याची समस्या मिटणार असल्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे.
No comments:
Post a Comment