पिंपरी - ‘‘आकुर्डी चौक ते प्राधिकरण वळणादरम्यानच्या १.४ किलोमीटरच्या अंतरावर सहा वेळा वेग कमी करावा (स्लोडाउन) लागतो. त्यामुळे ती वेगवान सेवा कशी होईल, याचा विचार करायला हवा. येत्या काही काळात मेट्रो सेवा सुरू झाल्यावर बीआरटीने कोण प्रवास करेल? त्यामुळे बीआरटी सेवा ही मेट्रोला पूरक ठरणारी असायला हवी,’’ असे प्रतिपादन पुणे अर्बन लॅब ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे वास्तुरचनाकार ओजस कुलकर्णी यांनी निगडी येथे केले.

No comments:
Post a Comment