Monday, 17 September 2018

कचरा रस्त्यावर टाकणार्‍या महिलेला शिकविला धडा

इसिए विभागप्रमुख सानप यांचे कर्तृत्व
सांगवी : पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये इकडे तिकडे रस्त्यावर, ओसाड ठिकाणी अजुनही कचरा टाकला जात आहे. महापालिका वारंवार कचरा रस्त्यावर टाकू नये म्हणून जनजागृती करताना दिसून येत आहे. मात्र त्याचा उपयोग होताना दिसून आहे. बाहेरील लोक येऊन उघड्यावर कचरा टाकून जातात. अनेकदा त्यांना कोणी रोख-ठोक करीत नाही. मात्र एका जागरूक नागरिकाने नुकताच एका महिलेला उघड्यावर कचरा टाकू नये म्हणून समज दिली. तसेच त्या महिलेला कचरा कुंडीतच कचरा टाकण्यासाठी प्रवृत्त करून त्या महिलेला कचरा कुंडीपर्यंत घेऊन गेले. हे जागरूक नागरिक म्हणजे इसिएचे ड क्षेत्रीय कार्यालय विभागाचे प्रमुख गोरक्षनाथ सानप आहेत. यांच्यासारखा जागरूकपणा प्रत्येक नागरिकाने दाखविल्यास शहर स्वच्छ राहण्यास नक्कीच मदत होईल. तसेच महापालिकेच्यावतीने करण्यात येणार्‍या जनजागृतीला यश आले असे म्हणता येईल.

No comments:

Post a Comment