पिंपरी – पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना व पवना औद्योगिक वसाहत यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योगासमोरील समस्या व तोडगा यावर मंगळवारी (दि. 18) बैठक होणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिली. पिंपरीतील पवना औद्योगिक वसाहत सोसायटीच्या सभागृहात दुपारी दोन वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष संदीप जोशी मार्गदर्शन करणार आहेत.

No comments:
Post a Comment