डी.वाय.पाटील रुग्णालयात पहिल्यांदाच लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
निर्भीडसत्ता न्यूज –
कोल्हापूर येथील कसबा बावडाच्या डायमंड रुग्णालयातून ब्रेनडेड रुग्णांने केलेल्या अवयवदानामुळे पिंपरीतील दोघांचे प्राण वाचणार आहे. कोल्हापूरातून आणलेले ‘ह्रदय’ हे थेरगांवच्या आदित्य बिर्ला हॅास्पीटलला तर ‘लिव्हर’ पिंपरीतील डॅा. डी.वाय.पाटील रुग्णालयास रस्ता मार्गाने रुग्णवाहिकेमार्गे दाखल झाले. त्यावेळी कोल्हापूर ते पिंपरी पर्यंत या 248 किमीच्या अत्यंत गजबजलेल्या रस्त्यावर ग्रीन कॅारिडोर तयार करण्यात आला. अवघ्या तीन तासात रुग्णावहिकेने 248 किमीचे अंतर कापले आहे. दरम्यान, पिंपरीतील डॅा.वाय.पाटील रुग्णालयात पहिल्यादांच लिव्हर प्रत्यारोपण आज (रविवारी) शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment