इंधन दरवाढीच्या कचाट्यात सापडलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएल) वारंवार होणारे बसेसचे शॉर्टसर्किट जोर का झटका देत आहे. त्याबरोबर प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मागील अडीच वर्षांत बसेसच्या इंजिन वायरिंगमध्ये बिघाड होऊन तब्बल 23 बसेस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. त्यामुळे महामंडळाला 5 कोटींवर तोटा सहन करावा लागला. तसेच दुर्घटनाग्रस्त बस साधारणपणे 15 दिवस रस्त्यावर न धावल्यामुळे दरदिवसाला महामंडळाला मिळणारे 10 हजारांचे नुकसान, जवळपास साडेतीन कोटींवर नोंदविले गेले आहे. मिळून पीएमपीएलच्या नुकसानीसह उत्पन्नांची 8 कोटींची राख झाली आहे.

No comments:
Post a Comment