पिंपरी – मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या “डीपीआर’ मध्ये मेट्रोने सखोल अभ्यास केला असून या मार्गावरील “रायडरशीप’ अर्थात या मार्गावर सर्वप्रकारे प्रवास करणारे प्रवासी याची देखील इत्यंभूत माहिती गोळा केली आहे. पीएमआरडीएने मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या कॉमन मोबिलिटी प्लॅनच्या धर्तीवरच येथे देखील अभ्यास झाला असून “पिक अवर्स’ (अत्याधिक वर्दळीच्या वेळी) मध्ये या मार्गावर ताशी 19 हजार प्रवासी मिळू शकतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सर्व प्रवाशांना मेट्रोची सुविधा देण्याचा प्रयत्न केल्यास मेट्रोला दर तीन मिनिटाला एक मेट्रो धावावी लागेल.
No comments:
Post a Comment