http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31465&To=10
पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी
अजुनही अपर्णा डोके ?
पिंपरी, 9 जुलै
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीत सहा महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवित महापौरपदाची माळ मोहिनी लांडे यांच्या गळ्यात टाकली. मात्र, याची नोंद महापालिका भवनातील खुद्द महापौर कक्षानेच घेतलेली नाही. या कक्षात असलेल्या फलकावर तत्कालीन महापौर अपर्णा डोके यांच्या नावाची अखेरची नोंद दिसून येते. डोके यांच्यानंतर योगेश बहल यांनी सव्वादोन वर्षे महापौरपद भूषविले. परंतु त्यांच्या नावाचा उल्लेखही या फलकावर करण्यात आलेला दिसत नाही. त्यामुळे सध्याच्या महापौर या मोहिनी लांडे आहेत की अपर्णा डोके आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
No comments:
Post a Comment