http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31507&To=10
मृत स्त्री अर्भकाला शवागाराला
ठेवून आई-बापाचा पोबारा
पिंपरी, 10 जून, नारायण बडगुजर, रोहिदास होले
जन्मल्यानंतर अवघ्या एका दिवसात मृत्यू झालेल्या स्त्री अर्भकास रुग्णालयातच टाकून माता-पित्याने पोबारा केल्याची हृदयद्रावक घटना पिंपरीतील यशवंराव चव्हाण स्मृती रुग्णालयात घडली आहे. रुग्णालय प्रशासनाला आणि पोलिसांनाही 'त्या' निर्दयी माता-पित्याचा अद्यापि शोध लागलेला नाही. त्यामुळे जवळ-जवळ एक महिन्यापासून रुग्णालयाच्या शवागारात मृत स्त्री अर्भक पडून आहे.
No comments:
Post a Comment