पाणीपट्टी वसुली (अ)भय योजना: पिंपरी । दि. १0 (प्रतिनिधी)
सर्व नळजोडांना मीटर बसविण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरले. त्यामुळे २४ तास पाणी पुरवठय़ाची योजना बारगळली. मीटर पद्धतीचा अवलंब झाल्यापासून पाणीपट्टी वसुलीत महापालिका कमी पडली. ३ वर्षांपासून पाणीपट्टीची सरसकट आकारणी होत आहे. नादुरुस्त मीटर, हवेने मीटर फिरण्याच्या, अवाजवी बिलाच्या समस्येने त्रस्त शहरवासीयांची पाणीपट्टी मोठय़ा प्रमाणावर थकीत आहे. ती वसूल करण्यासाठी प्रशासनाने अभय योजनेचे धोरण निश्चित केले असून, त्यास सर्वसाधारण सभेची मंजुरी घेतली जाणार आहे. वार्षिक सरासरी पाणीपट्टी, १५ टक्के सरळ व्याज, ३0 टक्के दंड असे योजनेचे स्वरूप आहे.
No comments:
Post a Comment