http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31750&To=8
बेकायदा बांधकामांवरील कारवाईच्या निषेधार्थ महापालिकेच्या सभेत सर्वपक्षियांचा 'हल्लाबोल'
पिंपरी, 20 जुलै
पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामांवर सुरु असलेल्या कारवाईच्या विरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारी (दि. 20) महापालिका सभेत 'हल्लाबोल' केला. कायद्याने आपण बांधिल असल्याने बेकायदा बांधकामांवर कारवाई करणे क्रमप्राप्त असल्याचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी ठणकावून सांगितले. त्यावर प्रशासन आडमुठेपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप करत प्रशासनाचा निषेधार्थ सभा तहकूब करण्यात आली. महापालिका सभा संपल्यानंतर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, अपक्ष आघाडीच्या नगरसेवकांनी धरणे धरत अनधिकृत बांधकाम प्रश्नावर तिन्ही आमदारांनी मुंबईमध्ये विधी मंडळासमोर सुरु केलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला.
No comments:
Post a Comment