शिक्षणाधिका-यांचा आणखी एक प्रताप ;साडेचार लाखांच्या उत्तरपत्रिकेची छपाई परस्पर
पिंपरी, 21 जुलै
महापालिकेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णू जाधव यांचा आणखीन एक प्रताप उघडकीस आला आहे. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता सुमारे साडे चार लाख रुपयांच्या उत्तरपत्रिका छपाईचे काम त्यांनी एका मुद्रणालयाला परस्पर दिले. त्यामुळे शिक्षण मंडळाने बिला अदा करण्यासाठी 'हात वर' केले. या सर्व गोंधळात संबंधित मुद्रणालयाचे बिल वर्षभरापासून 'लटकल्या'ने हे प्रकरण आयुक्तांपर्यंत पोहोचले आहे. त्याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी जाधव यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.
No comments:
Post a Comment