Thursday, 26 July 2012

उदिष्ट पूर्ण होऊनही अवाजवी टोलवसुलीच्या विरोधात मनसेचे टोल वसुली बंद आंदोलन

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31843&To=9
उदिष्ट पूर्ण होऊनही अवाजवी टोलवसुलीच्या विरोधात मनसेचे टोल वसुली बंद आंदोलन
वडगाव मावळ, 24 जुलै
पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरील टोलवसुलीचे उदिष्ट पूर्ण होऊनही जनतेची होणारी अवाजवी लूट थांबविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. 24) टोलपहारा दिला. या द्रुतगती मार्गावरील उर्से व वळवण, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा, वरसोली आणि तळेगाव-चाकण रस्त्यावरील इंदोरी या पाच नाक्यांवरील टोलवसुली मनसेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडली. मनसेचे कार्यकर्ते नाक्यांवर टोलपहारा करून वाहनचालकांना टोल न भरण्याचे आवाहन करीत आहेत. टोलवसुलीचा अहवालाची पारदर्शकता 'डिजिटल' पद्धतीने नाक्यांवर जाहीर होईपर्यंत मनसे आंदोलन करणार आहे.

No comments:

Post a Comment