http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31877&To=5
...ते हॉटेल उद्यानाच्या आरक्षित जागेवर असल्याचे उघड
पिंपरी, 25 जुलै
चिंचवड येथे पवना नदीपात्रालगत उभारण्यात आलेल्या हॉटेल रिव्हर व्ह्यू मागील भिंत कोसळून पाच दिवसांपूर्वी एक महिला गंभीर जखमी झाली. मात्र हे हॉटेलच महापालिकेला टीडीआरच्या मोबदल्यात उद्यानासाठी मिळालेल्या आरक्षित जागेवर उभारण्यात आल्याचे समोर आले आहे. या बेकायदा हॉटेलला दिलेल्या विविध परवान्यांबाबत शिवसेना नगरसेविका सीमा सावळे यांनी प्रश्न उपस्थित केला असून संबंधित अधिका-यांवर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.
No comments:
Post a Comment