तीर्थक्षेत्र आळंदीला पाणी देणार का?:
पिंपरी पालिका सभेत आज निर्णय
पिंपरी / प्रतिनिधी - बुधवार, २० जून २०१२
तीर्थक्षेत्र आळंदीला िपपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिण्याचे पाणी देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी बुधवारी (२० जून) महासभेसमोर आहे. आळंदी नगरपरिषदेने तीन वर्षांपासून पाठपुरावा केल्यानंतरही पिंपरी पालिकेने याबाबत निर्णय घेतलेला नाही. आतापर्यंत हा प्रस्ताव सातत्याने आणि जाणीवपूर्वक निर्णयाविना तहकूब ठेवण्यात येत असून, बुधवारच्या सभेत तरी निर्णय होणार की पुन्हा तहकुबीचाच खेळ होणार, याकडे आळंदीकरांचे लक्ष लागले आहे.
Read more...
No comments:
Post a Comment