http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30941&To=10
निगडी गोळीबार प्रकरणी <br>एक जण पोलिसांच्या ताब्यात
निगडी, 17 जून
निगडीच्या भक्ती-शक्ती चौकात रविवारी संध्याकाळी एका कारमध्ये एका केबल चालकावर झालेल्या गोळीबार प्रकरणी एका इसमाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पिस्तुलातून चुकून गोळी निसटल्यामुळे ही घटना घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र हा अपघात होता की खुनाचा प्रयत्न होता याबाबत शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी या इसमाला संशयावरून ताब्यात घेतले आहे.
No comments:
Post a Comment