Monday, 20 January 2014

पदपथ कोणासाठी?

मंगेश पांडे पिंपरी :
तुटलेले कठडे, अर्धवट बांधणी, निघालेले पेव्हिंग ब्लॉक, वाहने उभी करणे, शेणाच्या गोवर्‍या वाळत घालणे अशी अवस्था शहरातील रस्त्यालगत बांधण्यात आलेल्या ठिकठिकाणच्या पदपथाची झाल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. 
वाहनांप्रमाणे रस्त्यावरून पायी जाणार्‍यांची संख्याही अधिक असते. अशा पादचार्‍यांच्या सोईसाठी शहरातील रस्त्यांच्या कडेने लाखो रुपये खचरून महापालिकेने पदपथ बांधले आहेत. मात्र, इतरच कामासाठी पदपथांचा वापर होत असल्याने ते नेमके उभारले कशासाठी व कोणासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक पदपथांची दुरवस्था झाली आहे.

No comments:

Post a Comment